सिंधुदुर्गातील आंगणेवाडी यात्रेसाठी वांद्रे टर्मिनसहूनही यात्रा स्पेशल गाडी धावणार
सिंधुदुर्गातील आंगणेवाडी यात्रेसाठी या आधी जाहीर केलेल्या सहा विशेष गाड्यांपाठोपाठ मुंबईतील वांद्रे टर्मिनसहूनही यात्रा स्पेशल गाडी धावणार आहे. ही गाडी मुंबईतून सुटणार आहे.
कोकणातील सिंधुदुर्गमधील आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रेला भाविक मोठ्या संख्येने येतात. यात्रा कालावधीत भाविकांच्या सोयीसाठी रेल्वेने या आधी 6 गाड्या जाहीर केल्या आहेत. शनिवारी मुंबईतील वांद्रे तसेच गोव्यातील थीवी स्थानकापर्यंत धावणारी आणखी एक गाडी जाहीर केली आहे. ही गाडी (09091) दि. 15 फेब्रुवारी रोजी रात्री 11.45 वाजता सुटून दुसर्या दिवशी दुपारी साडेबारा वाजता ती थीवीला पोहचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (09092) थीवीहून दि.16 रोजी दुपारी 1 वा. 50 मिनिटांनी सुटेल आणि दुसर्या दिवशी पहाटे 4 वाजता ती वांद्रे टर्मिनसला पोहचेल.
ही गाडी बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ तसेच सावंतवाडी या स्थानकांवर थांबणार आहे.
www.konkantoday.com