रत्नागिरी तालुक्यातील जैवविविधता सर्वेक्षणाचा रिपोर्ट खोलीत बसून ?जिल्हाधिकाऱयांनी लक्ष घालण्याची भाजपा नेते दादा दळी यांची मागणी
जैव विविधता कायदा दोन हजार नुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना जैव विविधता व्यवस्थापन समिती आणि नोंदवही तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे ३१जानेवारी पर्यंत प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेला आपला अहवाल तयार करून पाठवायचा आहे तसे आदेश हरित लवादाचे आहेत वेळेत अहवाल सादर न करणाऱ्यांना ग्रामपंचायतींना १०लाखांपर्यंतच्या दंडाचीही कारवाईची तरतूद आहे असे असताना रत्नागिरी तालुक्यात जिल्हा परिषदने नेमणूक केलेल्या संस्थेने कोणालाही विश्वासात न घेता व प्रत्यक्ष ग्रामपंचायतीत व प्रत्यक्ष जागेवर न जाता जिल्हा परिषदेमध्ये मध्ये कोणत्या तरी खोलीत बसून ग्रामपंचायतीच्या नोंदवही बनवल्या जात असल्याचा आरोप भाजपा नेते दादा दळी यांनी केला आहे या प्रकाराची चौकशी करून त्याचा पण गांभीर्याने लक्ष घालावे असे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे जिल्हा परिषदेने नेमलेल्या संस्थेने प्रत्यक्ष गावात जाऊन ग्रामसभा बोलावून त्या भागाची पाहणी करून प्रत्येक ग्रामपंचायतीची नोंदवही बनवणे अपेक्षित आहे मात्र सदरची संस्था प्रत्यक्षात कोणतीही पाहणी न करता एका खोलीत बसून नोंदवह्या पूर्ण करीत आहेत जैवविविधता नोंदणीचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे प्रत्येक गाव परिसर, शेत, शिवार, नदी ,नाले याची पाहणी करून त्या ठिकाणावर आढळणाऱ्या वनस्पती ,संपदा ,खनिज, प्राणी, पक्षांची नोंद करून ही सर्व माहिती जैवविविधता नोंदवहीत केली गेली पाहिजे त्यामुळे त्यांच्या परिसरात आढळणाऱ्या विविध जैवविविधतेची ओळख व माहिती कायमस्वरूपी उपलब्ध होऊ शकणार आहे या योजनेचा उद्देश चांगला असला तरी प्रत्यक्षात मात्र कोणतीही पाहणी न करता केवळ खोलीत बसून माहिती भरली जातात त्यामुळे नोंदणीतील माहिती कितपत खरी व विश्वासावु आहे हे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे नाहीतर ती सर्वांची फसवणूक ठरणार आहे जिल्हा परिषदेने ज्या संस्थेची नेमणूक केली आहे त्या संस्थेच्या सदस्यांनी प्रत्यक्षात जाऊन ही माहिती गोळा करून खरी माहिती सरकारला देणे अपेक्षित आहे या या संस्थेला मानधनापोटी प्रत्येक ग्रामपंचायतीने सोळा हजार रुपये मिळणाऱ्या अनुदानातून द्यावयाचे आहेत ग्रामपंचायतीची संख्या लक्षात घेता कोट्यवधी रुपयांचे मानधन या संस्थेला मिळणार आहे असे असूनही ही संस्था प्रत्यक्षात न जाता वस्तुनिष्ठ माहिती नोंदवहीत नोंदवीत नसल्याच्या तक्रारी येत असून या सर्व प्रकरणात माननियजिल्हाधिकाऱयांनी गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी दळी यांनी निवेदनाद्वारे केली आहे
www.konkantoday.com