पतीने उपमा खाल्ला नाही म्हणून पत्नीची आत्महत्या
खेड मौजे धामणंद कदमवाडीतील अरूणा विलास कदम या महिलेने पतीला दिलेला उपम्याचा नाष्टा त्याने खाल्ला नाही या रागातून तिने गळफास लावून आत्महत्या केली. यातील अरूणा कदम हिने आपला पती विलास याला उपम्याचा नाष्टा करून दिला होता. तो त्यानी खाण्यास नकार देवून ते कामावर निघून गेले. त्यामुळे या गोष्टीचा राग येवून अरूणा ही धामणंद येथील आपल्या घरी गेली व तिने रागाच्या भरात गळफास लावून आत्महत्या केली.
www.konkantoday.com