वैश्य युवक रत्नागिरीतर्फे रक्तदान शिबिर संपन्न
रत्नागिरीतील वैश्य समाजातील युवक एकत्र येऊन वैश्य युवक रत्नागिरीतर्फे प्रजासत्ताक दिनी रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा शासकीय रुग्णालय येथे करण्यात आले होते.या शिबिरांमध्ये अनेक वैश्य तसेच इतर समाजातील युवक व युवती यांनी भाग घेऊन रक्तदान केले.या उपक्रमाद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीसाठी ३८ ते ४० बॅग रक्त उपलब्ध करून दिले.या उपक्रमासाठी वैश्य समाजातील तसेच अन्य समाजातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन प्रोत्साहन दिले.सामाजिक बांधिलकी दाखवून प्रजासत्ताकदिनी असा सामाजिक उपक्रम केल्याबद्दल वैश्य युवक रत्नागिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
www.konkantoday.com