हयगयीने एसटी बस चालविल्याने प्रवासी जखमी

खेड वरवली येथील कृष्णा महादेव सावंत हे खेड वडगांव गावी जाणार्‍या मुक्कामाच्या बसमधून घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यांना जागा न मिळाल्याने ते बसमधील दांड्याला धरून उभे होते. बसचा चालक चालक सतिश फाकरे याने बस धोकादायक व हयगयीने चालवत अचानक ब्रेक लावला त्यामुळे यातील फिर्यादी सावंत यांच्या खांद्याला झटका बसून दुखापत झाली. याबाबत त्यानी खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button