
ओल्या काजूगरांना आले बदामाचे भाव
कोकणी पद्धतीच्या जेवणात ओल्या काजूगराला खूप मागणी असते. काजूगराच्या सिझनमध्ये शाकाहारींना काजूगराची उसळ म्हणजे मेजवानीच असते. मात्र आता या खवय्यांना महागाईचा फटका बसणार आहे. यंदा लांबलेल्या पावसाचा परिणाम आंब्याबरोबरच काजूवरही झाला आहे. यंदा काजू बीचे उत्पादन उशिराने येणार हे निश्चित आहे. बी कमी असल्यामुुळे ओल्या काजूगराचे दर वधारले आहेत. एक महिना उशीराने दाखल झालेल्या काजूगराला जणू बदामाचा दर आला आहे काजुचा दर वीस रुपयांना तीन असा आहे.
www.konkantoday.com