जिल्ह्यातील पहिली आंबा पेटी दापोलीतून रवाना
दापोली तालुक्यातील आडे येथील आंबा व्यावसायिक अरूण लिमये यांनी जिल्ह्यातील पहिली हापूस आंबा पेटी मुंबईतील वाशी मार्केटला पाठवण्याचा मान पटकावला आहे. वाशी मार्केटला आबाजी रामजी ऍण्ड कंपनी यांना ही हापूस पेटी विक्रीसाठी पाठवण्यात आली आहे.
साधारणपणे ८ ते १० हजार रुपये पर्यंत ४ डझन पेटीचा दर मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
www.konkantoday.com