नव्या पालकमंत्र्यांच्या आगमनाकडे रत्नागिरीकरांचे डोळे लागले

0
29

रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून परिवहन मंत्री ना. अनिल परब यांची नेमणूक झाली आहे. मुळचे सिंधुदुर्गचे असलेले व सध्या मुंबईस्थित असलेले परब यांची रत्नागिरीचे पालकमंत्री म्हणून नेमणूक झाल्यानंतर पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याच्या दौर्‍यावर कधी येणार याची रत्नागिरीकरांना उत्सुकता लागली आहे. परब यांचेकडे परिवहन खाते असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूणसारख्या बस स्थानकाची अर्धवट असलेली कामे मार्गी लागतील अशी जनतेची अपेक्षा आहे तसेच जिल्ह्याच्या एसटीच्या कारभारातही सुधारणा होईल अशी जनतेला खात्री आहे. यासाठी पालकमंत्र्यांचा रत्नागिरी दौरा कधी लागणार याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here