कोकणात आणि विशेषतः सिंधुदुर्गात समुद्र जैवविविधतेबाबत अभ्यासासाठी फिशरीज व बायोडायव्हर्सिटी अभ्यासक्रम केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी वेंगुर्ले येथे जागा निश्‍चित करण्यात आली आहे. येत्या जूनपर्यंत नवीन अभ्यासक्रम सुरू करणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी दिली. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील मत्स्यविभाग, जैवविविधतेकडे विशेष लक्ष देण्याच्या दृष्टीने मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांना गती देण्याच्या सूचना केल्या आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here