
रत्नागिरी जिल्हय़ात येणाऱया पर्यटकांची सुरक्षा टांगणीवर ,जीवरक्षकांना मानधन देण्यास शासनाचा नकार
रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनाबाबत शासनाकडून वारंवार घोषणा होत असल्या तरी प्रत्यक्षात शासनाकडून पर्यटनाकडे दुर्लक्ष केले जात आहे रत्नागिरी जिल्हय़ातील समुद्र किनारे हे पर्यटकांचे आकर्षण असल्याने त्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने धाव घेत असतात मात्र अनेक वेळा त्या ठिकाणी पर्यटक समुद्रात बुडण्याच्या अनेक घटना घडतात गेल्या काही वर्षात गणपतीपुळे आरेवारे गुहागर दापोली व काही समुद्र किनाऱयांवर पर्यटक समुद्रात बुडाले त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी किनाऱ्यांवर जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आल्या होत्या .अशा समुद्र किनाऱयावर २६ जीवरक्षक नेमण्यात आले होते.या जीवरक्षकांना मानधन कोणी द्यायचे यावरून वाद आहे शासनाने या जीवरक्षकांना मानधन देण्यास नकार देऊन ग्रामपंचायतीने मानधन देण्याच्या सूचना केल्या. ग्राम पंचायतींना हे मानधन देणे परवडत नसल्याने त्यांनी जीवरक्षकांच्या सेवा समाप्त केल्या यामुळे आता कोकणात येणाऱया पर्यटकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे .
www.konkantoday.com