
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट संपवण्यासाठी नूतन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची युद्धपातळीवर कामाला सुरुवात
रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असलेली कोरोनाची दुसरी लाट संपवण्यासाठी नूतन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी युद्धपातळीवर कामाला सुरुवात केली आहे. यात पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्यावर भर दिला जाणार असून आरोग्यासह सर्व यंत्रणांची मिळून वॉर रुम तयार करुन समन्वय साधला जाणार आहे. जिल्ह्यात १०हजारपर्यत टेस्टिंग वाढवले जाणार असून सुपर स्प्रेडर ठरु शकणार्यांसह पर्यटक व गावी येणार्यांचे नाक्यांवर टेस्टिंग सुरु केले जाणार आहे असे सांगताना नुतन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी सर्वानी मिळून तिसरी लाट दूर ठेवू असे आवाहन केले आहे.
www.konkantoday.com