
त्या सात व्यावसायिकांना ३ कोटी ६२ लाख भरण्याची नोटीस.
शासकीय जागेत भाडेतत्वावर असलेल्या गुहागर शहरातील नाक्याजवळ श्री व्याडेश्वर मंदिरालगतच्या सात व्यावसायिकांना महसूल विभागाने अंतिम नोटीस बजावली आहे. रेडीरेकनर दराप्रमाणे सुधारीत दरांची रक्कम तब्बल ३ कोटी ६२ लाख ३६ हजार ७५३ रुपयांवर पोहचली असून ती भरण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.व्याडेश्वर मंदिरालगत जागा देण्यात आली होती. १९६७ पर्यंत या जागांचा भाडेपट्टा भरण्यात आला होता. त्यानंतर यातील काहींनी आपण कब्जेदार असल्याचाही दावा गुहागर महसूलबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात केला होता.
परंतु या सर्वांची तपासणी सुरू असताना सदर जागा महसूल विभागाची असल्याचे नक्की झाल्यावर या सातजणांना ते भाडेपट्ट्यावर असल्याने इतर अधिकारात ठेवण्यात आले होते. त्यानंतर या सर्वांना या जागेचे १९६७ पासूनचे भाडे व्याजासह भरण्याचे आदेश काढण्यात आले होते. या आदेशाविरोधात येथील व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अपील केले होते. यावर अतिरिक्त जिल्हाधिकार्यांनी महसूलच्या बाजूने निकाल देत भाडेपट्टा वसुलीचे आदेश कायम ठेवले होते.www.konkantoday.com