मालवण दांडी किनारपट्टीवरमोठ्या लाटेत पाच पर्यटक समुद्राच्या पाण्यात फेकले गेले
पर्यटन हंगाम तेजीत आला असताना मालवणात दुर्घटनांचे सत्र सुरू आहे. मालवण दांडी किनारपट्टीवर साहसी जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटत असताना मोठ्या लाटेत पाच पर्यटक समुद्राच्या पाण्यात फेकले गेल्याची घटना घडली. यात तिघा पर्यटकांची प्रकृती गंभीर बनल्याने खासगी रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा येथे त्यांना हलविण्यात आले.
देवबाग येथे काही दिवसांपूर्वीच बोट दुर्घटना घडून एका महिलेचा मृत्यू झाला होता.परिणामी पर्यटकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
www.konkantoday.com