
२१ व्या वर्षी अमेरिकेत पायलट, चिपळूणच्या सुपुत्राची गगनभरारी
चिपळूण तालुक्यातील पोसरे येथील महम्मद युसून आसिफ खोत याने अमेरिकेमधील ग्लोबल ऍकॅडमीमधून वयाच्या २१ व्या वर्षी पायलट होण्याचा बहुमान मिळविला आहे. त्याच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. पोसरेतील महंमद युसूफ आफिस खोत याला लहानपाणापासून विमानाची प्रचंड आवाड होती. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रचंड मेहनत घेत त्याने यशाचे शिखर अखेर गाठले आहे. आकाशात झेप घेण्याची जिद्द असलेला हा तरूण पोसरे गावचे रहिवासी युसूफ खोत यांचा सुपुत्र व उद्योगपती फैसल खोत यांचा पुतण्या आहे.
महंमद युसुफ आसिफ खोत याचं शालेय शिक्षण भारताबाहेर कतार या देशात झाले असून वैमानिक होण्याच्या स्वप्नापोटी अमेरिकत त्याने ग्लोबल एवियेशन या संस्थेमध्ये ऍडमिशन घेतले व आपले स्वप्न साकार केले.
konkantoday.com