कोकण क्लब रत्नागिरी दक्षिणच्या वतीने एक दिवसीय मार्गदर्शन परिषद
कोकण ही डॉलर भूमी! कोकणातील हापूस आंबा, काजू, मसाले, मासे …सर्वात महत्त्वाचे पर्यटन यातून कोट्यावधी डॉलर्सची अर्थव्यवस्था उभी राहू शकेल. जागतीक दर्जाचा पर्यटन उद्योग, मत्स्य शेती , आधुनिक कृषी तंत्रज्ञान, फलोद्यान, प्रक्रिया उद्योग .. यातून कोकणात हजारो उद्योग व लाखो रोजगार निर्माण होऊ शकतात . कोकणात पर्यायाने आपल्या दापोली , मंडणगड , खेड , गुहागर परिसरात छोट्या छोट्या ग्रामीण उद्योगातून विकासाच्या प्रचंड संधी आहेत .
कोकणावर सातत्याने होणारा शासकीय अन्याय, शासकीय योजना राबवण्याबाबत कोकणातील अनास्था व कोकणवासियांची कोकण विकासाबद्दल उदासीनता यावर मात करून पुढील पाच दहा वर्षात कोकणात गावागावात हजारो उद्योग उभे राहावेत कोकणवासियांनी कोकणातल्या जमिनी न विकता विकसित कराव्यात याकरिता एक व्यापक अभियान कोकण उद्योजक प्रतिष्ठान , कोकण क्लब राबवीत आहे.
कोकणातल्या जमिनी आता सोन्याच्या खाणी !
पर्यटन उद्योग
कृषी पर्यटन, होम स्टे, व्हिडिओ हॉटेल्स, रिसॉर्ट्स थीम पार्क …..
*मत्स्य उद्योग*
खाऱ्या पाण्यातील मत्स्यशेती, कोळंबी पालन, खेकडा पालन, गोड्या पाण्यातील केज कल्चर, बासा , तीलापिया पालन, शोभिवंत माशांची शेती…
*आधुनिक शेती*
सेंद्रिय शेती हळद लागवड, भाजीपाला, सांग, बांबू वनशेती, काळी मिरी जायफळ मसाला शेती, कलिंगड, टरबूज कॅश क्रॉप्स …
अन्न, फळे व मत्स्य प्रक्रिया उद्योग…
या निवडक विषयांवर पुढील दहा वर्ष लक्ष केंद्रित करून, शासकीय योजनांचा प्रभावी वापर करून कोकणात आणि रत्नागिरी उत्तर जिल्ह्यात हजारो प्रकल्प उभे रहावे ही कोकण क्लब रत्नागिरी जिल्हा संघटनेचे उद्दिष्ट आहे.
यादृष्टीने एक महत्वपूर्ण एक दिवसीय मार्गदर्शन परिषद आयोजित केले आहे. ओणी हायस्कूल , ओणी येथे शनिवार दिनांक १३ जानेवारी २०२० रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत हा उपक्रम पार पडेल.
*कार्यक्रम पत्रिका*
सकाळी १०:०० वाजता उद्घाटन,
मा रविंद्र प्रभुदेसाई चेअरमन पितांबरी ग्रूप
हानीफ काझी राजापुर अर्बन बँक
जयंतराव अभ्यंकर राजापुर अर्बन बँक
वासुदेव तूलसणकर अध्यक्ष ओणी हाये स्कुल
१०:३० वाजता पर्यटन क्षेत्रातील उद्योग आणि विकासाच्या संधी
होम स्टे. ऍग्रो टुरिझम. आधुनिक पर्यटन, थीम पार्क
वक्ते
संजय यादवराव * (संस्थापक ग्लोबल कोकण, कोकण क्लब)
भाई रिसबुड कातळ शिल्प , हेरीटेज पर्यटन तज्ञ
*मकरंद केसरकर * (कृषी पर्यटन तज्ञ)
१२:०० वाजता मस्य उद्योगातील व्यवसाय व विकासाच्या संधी
व्हेनामी निर्यातक्षम कोळंबी शेती, तिलापिया, बासा, गोड्या पाण्यातील मत्स्य शेती, धरणाच्या पाण्यातील बंदिस्त मासे पालन- केज कल्चर,
वक्ते
*डॉ राजीव भाटकर* (मत्स्य शेती तज्ञ)
काशिनाथ तारी * (मत्स्य शेती तज्ञ)
१:३० वाजता भोजन
२:३० वाजता आधुनिक शेती तंत्रज्ञान, व्यापारी शेती, सेंद्रिय शेती, मसाला शेती
उस लागवड पीतांबरी ग्रूप
*मिलिंद प्रभू* (मसाला शेती प्रगतिशील शेतकरी)
विजय जोगळेकर आंबा तज्ञ
नीलेश लेले वायनरी उदयोग
4:३० शासकीय योजना
महा व्यवस्थापक जिल्हा उदयोग केंद्र .
जिल्हा कृषी अधिकारी
5-30 वाजता जलसंवर्धन व जल नियोजन *राहुल तिवरेकर जलनायक , जलतज्ञ
त्या नंतर समाराेप हाेणार आहे.
www.konkantoday.com