
सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ आज रत्नागिरीतील नागरिकांनी केले समर्थन
केंद्र सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या सुधारित नागरिकत्व (सीएए) कायद्याला आज शहरातील विविध संघटना व नागरिकांनी समर्थन दिले. आज मारूती मंदिर येथे रत्नागिरीकर जमले. यावेळी त्यांनी भारतमातेचा जय जयकार केला. या कायद्याच्या समर्थनार्थ त्यांनी घोषणाही दिल्या. या कायद्याविषयी नाहक गैरसमज पसरवला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या समर्थनार्थ कार्यक्रमाला ऍड. बाबा परूळेकर, शिल्पाताई पटवर्धन, मुन्नाशेठ सुर्वे, ऍड. विलास पाटणे, संतोष पावरी, ऍड. भाऊ शेट्ये, साईजित शिवलकर, अविनाश महाजन, केशव भट, कॅप्टन कोमलसिंग, राहुल राजोरीया, आनंद जोशी, कौस्तुभ सावंत, प्रशांत डिंगणकर, राजू कीर, रविंद्र भुवड आदीजण सहभागी झाले होते. यावेळी घोषणांनी मारूती मंदिर परिसर दुमदुमून गेला.
www.konkantoday.com