
मिरजोळे पाटील वाडी येथे नळपाणी योजनेच्या चरात ट्रक अडकल्याने वाहतूक तीन तास ठप्प
रत्नागिरी शहराच्या विस्तारीत नळपाणी योजनेसाठी खोदण्यात आलेल्या शहरांमध्ये ट्रक रुतल्याने मिरजोळे पाटीलवाडी येथे तीन तास वाहतूक ठप्प झालीहोती हा प्रकार काल घडला होता पाईपलाईनसाठी चर खोदल्यानंतर त्यावर तात्पुरती माती टाकून ठेवण्यात आली होती त्यामुळे त्या ठिकाणी ट्रक रुतला यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले या भागातील वाहतूक ठप्प झाली त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तेथील अधिकाऱयांना चांगलेच धारेवर धरले प्रभारी नगराध्यक्ष बंड्या साळवी देखील तेथे हजर झाले शेवटी हा ट्रक बाजूला घेण्यात आला त्यानंतर वाहतूक सुरू झाली
www.konkantoday.com