
कोरोनाचं निदान ५ मिनिटात, रॅपिड टेस्टला मान्यता : आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताना दिसत आहे. ‘राज्यात ५ हजार चाचणींची क्षमता आहे. आपल्याला रॅपीड टेस्टची मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे प्राथमिक चाचणीतच प्रादूर्भाव आहे का ते कळेल. तसेच ब्लड घेतल्यावर केवळ ५मिनिटात कोरोना आहे की नाही असे समजणारी ही रॅपिड टेस्ट आहे,’ असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.रॅपीड टेस्टचा अर्थ असा आहे की, ब्लड घेतल्यावर पाच मिनिटात आपल्या शरीरात अॅन्टीबॉडीज तयार झालेले आहेत का त्याच्या प्रमाणावरुन संबंधित व्यक्तीला इन्फेक्शन आहे का ते समजणार आहे.
www.konkantoday.com