
जाकादेवी येथे कौटुंबिक वादातून विवाहितेने स्वतःला पेटवले
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथे राहणाऱ्या मिठबावकर पती पत्नीच्या कौटुंबिक भांडणानंतर पत्नीने स्वतःला पेटवून घेतले.ही घटना मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.पत्नीने स्वतःला पेटवून घेताच तिला वाचवायला गेलेल्या पतीसह चार वर्षांचा मुलगा देखील भाजल्याचा प्रकार घडला आहे.अधिक उपचारासाठी त्यांना कोल्हापूरला हलवण्यात आले आहे.
www.konkantoday.com