बागायतीवर बुलडोझर फिरवून एमआयडीसी नको-वाटद शेतकरी संघर्ष समिती
तालुक्यातील वाटद एमआयडीसीला १०० टक्के विरोध असल्याने ती रद्द करण्यात यावी. येथे सर्व शेतकरी सधन आहे. आंबा, काजू, शेती येथे मोठ्या प्रमाणात आहे. त्यावर बुलडोझर फिरवून ही एमआयडीसी नको, अशी मागणी वाटद एमआयडीसी शेतकरी संघर्ष समितीने जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली. याबाबत लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची याबाबत भेट घेणार असल्याचे समितीच्या पदाधिकार्यांनी सांगितले.
www.konkantoday.com