
रत्नागिरी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राकेश चव्हाण पदमुक्त
नगराध्यक्षपदाची पोटनिवडणूक होत असताना इंदिरा कॉंग्रेसमधील कलह उसळला आहे. या पक्षाचे रत्नागिरी शहराध्यक्ष राकेश चव्हाण यांना पदावरून हटविल्याचे पत्र तातडीने देण्यात आले आहे. त्याचवेळी चव्हाण यांनी म्हटले आहे की, भाजपामधून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या रमेश शहा यांना उमेदवारी देण्यास विरोध केल्याने आपणास हटविण्याचा मनमानी निर्णय जिल्हाध्यक्षांनी घेतला आहे.
९ डिसेंबर रोजी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड. विजय भोसले यांनी चव्हाण यांना पत्र लिहित जिल्हाध्यक्ष पदात बदल झाल्यानंतर कार्यकारिणी बरखास्त झाली. सबब रत्नागिरी शहराध्यक्ष पदावरून मुक्त करण्यात आले.
www.konkantoday.com