
जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे दापोली येथे आयोजन
रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील वरिष्ठ गट फ्रि स्टाईल, गादी , माती ग्रिकोरोमन, वरिष्ठ महिला, कुमार गट मुले, मुली व युवा गट अजिंक्य पदाच्या कुस्ती स्पर्धा रविवार दि.15/12/2019 रोजी सकाळी 10 वाजता दापोली येथील, चैतन्य सभागृह, आ.गो.सोहनी विद्यामंदिर, दापोली नर्सरी रोड, टेलिफोन एक्सेंज समोर, दापेाली येथे जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
सदर कुस्ती स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जन्मलेल्या कुस्तीगिरांना भाग घेता येईल. यासाठी जन्मतारखेचा दाखला म्हणून आधारकार्ड, नगर परिषद, ग्रामपंचायत किंवा शाळा व महाविद्यालय यांचा मुळप्रती मधील जन्मदाखला आणणे गरजेचे आहे. खेळाडूंनी रेशनकार्डची मुळप्रत आणणे आवश्यक आहे. वास्तव्याबाबत शंका किंवा तक्रार झाल्यास तसेच खेळासंबंधी कोणतीही तक्रार झाल्यास असोसिएशनचा निर्णय अंतिम राहील. प्रवेश फी वरिष्ठ गट पुरूष, गादी, माती, ग्रिकोरोमन महिला व युवा गट 100रू. व कुमार गट मुले, मुली 50 रू.अशी आहे. जिल्हा स्पर्धेसाठी स्वखर्चाने जाणे-येणेचे आहे.
वयोगट पुढीलप्रमाणे कुमार मुले-(1/1/2003 पासून पुढील),वरिष्ठ गट प्रौढ फ्रिस्टाईल गादी व माती, वरिष्ठ गट मुले ग्रिकोरोमन, प्रौढ गट महिला (18 वर्षा वरील), सब ज्युनियर मुली(कुमार मुली)(1/1/2003 पासून पुढील) आहेत.अधिक माहितीसाठी – श्री.श्रीकृष्ण विलणकर अध्यक्ष, श्री.सदानंद जोशी प्र.कार्यवाह , श्री.वैभव चव्हाण व श्री.योगेश हरचेरकर, श्री.चेतन राणे दापोली यांच्याशी संपर्क साधा. या स्पर्धेच्या आयोजनात श्री.वैभव शिवाजी चव्हाण व श्री.चेतन राणे यांचे सहकार्य लाभले.
www.konkantoday.com