अगं बाई सासुबाई या लोकप्रिय मालिकेत होणार कोकणचे दर्शन
समाज आणि कुटुंबात घटस्फोटीत व विधवा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन सन्मानजनक नसतो. त्यामुळे अशा स्त्रियांचे जीवन असह्य होतील पण झी मराठीवरील अगं बाई सासूबाई या मालिकेत ज्येष्ठ स्त्री-पुरूष समानता दाखवून चुकीचे समज दूर केले आहेत आणि खर्या अर्थाने महिला सबलीकरण होत असल्याची माहिती प्रसिद्ध अभिनेता डॉ. गिरीश ओक यांनी दिली.
कोकणातील सौंदर्य या मालिकेत येणार आहे. सावंतवाडी परिसरातील तीन दिवसांचे चित्रीकरण करण्यात आल्याचे डॉ. गिरीश ओक यांनी सांगितले. छोट्या पडद्यावरील मालिका आऊटडोअर चित्रिकरण परवडत नाही. परंतु अगं बाई सासूबाई या मालिकेत कोकणचे निसर्गसौंदर्य आले असल्याचे ते म्हणाले. अगं बाई सासूबाई या मालिकेत डॉ. गिरीश ओक हे अभिजित राजे अभिनेत्री निवेदिता सराफ या आसावरी तर आशुतोष पत्की हे सोहम अर्थात मुलाची भूमिका साकारत आहेत. सावंतवाडी ते आकेरी येथे चित्रिकरण करण्यात आले.
www.konkantoday.com