लोटेत रासायनिक सांडपाणी नाल्यात
लोटे एमआयडीसीतील अनेक कारखान्यातून रात्री रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडले जात असल्याचे प्रकार उघड झाले आहेत. यामुळे एमआयडीसीतील नाल्यांचे पाणी रंगीबेरंगी दिसत आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
लोटे एमआयडीसीतील डोंगरातून वाहून येणारे पावसाचे पाणी सर्वत्र पसरू नये, ते थेट खाडीला किंवा स्थानिक नदीला जावून मिळावे यासाठी एमआयडीसीमध्ये अंतर्गत नाले काढण्यात आले आहेत. मात्र या नाल्यांत अनेक रासायनिक कंपन्यांकडून घातक रसायनमिश्रित पाणी रात्री सोडले जाते. पावसाळ्यात हे सांडपाणी पाण्यात विरघळत असल्याने मोठ्या प्रमाणात ते नाल्यात दिसत नाही. मात्र पावसाचे पाणी थांबले की नाल्याचा रंग बदललेला कळतो.
www.konkantoday.com