राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप येत्या एक-दोन दिवसांत होण्याची शक्यता
राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप येत्या एक-दोन दिवसांत होण्याची शक्यता असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तूर्त गृहखाते राहणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे यांच्यात शुक्रवारी रात्री झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
आजच्या बैठकीला पवार, ठाकरे यांच्याशिवाय अजित पवार, जयंत पाटील, खा. संजय राऊत, मंत्री एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई उपस्थित होते. मंत्रिमंडळाचा शपथविधी २८ नोव्हेंबरला झाला. मात्र अजूनही खातेवाटप होऊ शकले नाही.
www.konkantoday.com