
जिल्ह्यातील किनारपट्टीवर आता सॅटेलाईटची नजर
सातत्याने होणारी वादळे, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टीचा भाग सॅटेलाईट प्रकल्पाद्वारे जोडण्याचा प्रयत्न केंद्रीय आपत्ती निवारण विभागाकडून सुरू आहे. नैसर्गिक आपत्तीची माहिती संबंधित गावांना तातडीने मिळावी आणि संभाव्य धोका टाळता यावा यासाठी केंद्र सरकारच्या नैसर्गिक आपत्ती विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे.
यासाठी समुद्रालगतची गावे सॅटेलाईटद्वारे जोडली जाणार आहेत. त्या गावात वॉकीटॉकी दिली जाणार आहेत. गावात असलेल्या महसूल, ग्रामविकास, बंदर व मत्स्य खात्यांच्या कार्यालयात वॉकीटॉकीद्वारे संकटाची माहिती दिली जाईल. समुद्रातील चक्रीवादळासारख्या संकटांसह अन्यही नैसर्गिक संकटांची माहिती तात्काळ दिली जाणार आहे. मच्छिमार, तेथील लोकवस्ती आणि बंदरांचेही संरक्षण होणार आहे.
www.konkantoday.com