नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय
नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱया आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती त्या पार्श्वभूमीवर हे गुन्हे मागे घेण्यात आले आहेत .मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निर्णयाचे खासदार विनायक राऊत यांनी तसेच रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी आभार मानले आहेत सिंधुदुर्गातील आमदार नितेश राणे यांनी आपणहे खटले मागे घ्यावेत अशी विनंती केली होती ती मागणी मान्य झाल्याचे सांगितले
www.konkantoday.com