मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा ,फडणवीस सरकार कोसळले
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपण राजीनामा देणार असल्याचे आज पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले.ही पत्रकार परिषद आटोपल्यावर ते राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देणार असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी समर्थन देण्याचे सांगितल्यावर आपण राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता.हे सरकार स्थापन केले होते परंतु आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अजित दादा पवार यांनी आपणाला भेटून आपण उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले व त्यांनी तसा तो राजीनामा दिला त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी आपल्याकडे बहुमत नसल्याने आपणही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.त्यानी नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे विश्वासदर्शक ठराव येण्याआधीच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याने फडणवीस सरकार कोसळले आहे .
www.konkantoday.com