
बोटीतून तोल जाऊन पडल्याने खलाशाचा मृत्यू
रत्नागिरी जवळील आरेवारे समुद्रात बोटीतून पडल्याने राजाराम पाते राहणार दापोली यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला राजाराम हा साखरतर येथील जहांगीर मुल्ला यांच्या बोटीवर खलाशी म्हणून काम करीत होता ही बोट मासेमारीसाठी आरेवारे समुद्रात गेली असता सकाळी सहाच्या सुमाराला राजाराम याचा तोल गेल्याने तो बोटीतून खाली पाण्यात पडला त्याचा बुडून मृत्यू झाला .
www.konkantoday.com