चिपळुणातील भाजी व्यापारी प्रशांत पवार यांचा अपघाती मृत्यू
पुण्याजवळ खेड शिवापूर टोल नाक्या जवळ झालेल्या अपघातात चिपळुणातील भाजी व्यापारी प्रशांत जगन्नाथ पवार यांचा मृत्यू झाला.पवार हे चिपळूण भोगाळे येथे भाजी व्यवसाय करीत होते ते भाजी आणण्यासाठी नेहमी पुणे गुलटेकडी भाजी मार्केटमध्ये जात होते .मंगळवारी रात्री ते टेम्पो घेऊन जात असता पुण्याजवळील शिवापूर टोलनाका येथे टेम्पो व कंटेनरची धडक झाली या अपघातात पवार यांचा मृत्यू झाला तर आयरिश टेंपोचालक किशोर कांबळे व टेम्पोतील अभिषेक जागुष्टे हे जखमी झाले आहेत .
www.konkantoday
com