बचत गटांच्या माध्यमातून मोकाट गुरांचे संगोपन करा, सामाजिक कार्यकर्ते ऍड. अमेय परूळेकर यांची मागणी

रत्नागिरी शहरामध्ये मोकाट गुरांचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यावर नगर परिषदेने ठोस उपाययोजना करावी. रत्नागिरीमध्ये ३२६ बचतगट स्थापन करण्यात आले आहेत. या बचत गटांच्या माध्यमातून या मोकाट गुरांचे संगोपन करावे. त्या गुरांचे शेण, गोमुत्रापासून ×उत्पादने बनवणारे बचतगट असावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ऍड. अमेय परूळेकर यांनी रत्नागिरी नगर परिषदेकडे केली असल्याचे पत्रकाारांशी बोलताना सांगितले.यासंदर्भात रत्नागिरी नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांकडे त्या मागणीचे पत्र ऍड. अमेय परूळेकर यांनी दिले आहे. मुख्याधिकार्‍यांना दिलेल्या पत्रात मोकाट गुरांचा प्रश्‍न गंभीर होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. रत्नागिरी शहरात दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका योजनांतर्गत ३२६ बचतगट स्थापन करण्यात आले आहेत. या मोकाट गुरांचे संगोपन बचत गटांच्या माध्यमातून व्हावे. गुरांचे शेण, गोमुत्रापासून उत्पादन करणारे बचतगट निर्माण व्हावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. बचत गटांतील सदस्यांना योग्य प्रशिक्षण दिले. त्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नगर परिषदेने मदत केली तर मोकाट गुरांचे संगोपन बचत गट करू शकतील. त्यातून बचतगटांना अर्थाजन होईल. रत्नागिरी शहरातील मोकाट गुरांचा प्रश्‍नदेखील सुटण्यास मदत होईल, असा विश्‍वास ऍड. अमेय परूळेकर यांनी व्यक्त केला आहे. मोकाट गुरांच्या आरोग्य तपासणीसाठी तज्ञ वैद्यकीय अधिकारी नेमला जावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button