जिल्ह्यातील होमगार्डस मानधनाविना
पोलिसांप्रमाणेच २४ तास सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील ५४३ होमगार्डसना गणेशोत्सवापासून विविध बंदोबस्ताच्या सेवा बजावूनही अद्याप मानधन मिळालेले नाही. यामुळे अनेकांसमोर मानधनाअभावी कुटुंब चालवायचे कसे, असा प्रश्न उभा राहिला आहे.
गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, ईद, निवडणूक, संवेदनशील कालावधीत जिल्ह्यातील सुरक्षेसाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्डस काम करत असतात. अगदी तुटपुंज्या मानधनावर काम करणार्या होमगार्डसना कुटुंबासोबत सण साजरे करता येत नाहीत. सण नसतील त्यावेळी बेकार म्हणून घरी बसावे लागते. रत्नागिरी जिल्ह्यात १८ ठिकाणी ५४३ होमगार्डस कार्यरत आहेत. गणपती सणापासून मानधन मिळाल्यालेले नाही.
www.konkantoday.com