
एशियन बिझनेस लीडरशिप अॅवॉर्डने रितू छाब्रिया यांचा गौरव
मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांना एशिया बिझनेस लीडरशिप अवॉर्ड 2019- सोशल इन्फ्लुएन्सर या पुरस्काराने गौरवण्यात आले दुबईमध्ये संयुक्त अरब अमिरातीचे मिनिस्टर ऑफ टॉलरन्स शेखर नाहायन यांच्या हस्ते सन्मान झाला
एशियन बिझनेस लीडरशिप अॅवॉर्ड समारंभ दुबईतील जुमेराह एमिटेस् टॉवर्स हॉटेल येथे सत्कार समारंभ झालाप्रदेशाच्या प्रगती, विकासासाठी लक्षणीय योगदान देणार्या 15 जणांना सन्मानित केले. त्यात रितू छाब्रिया यांचा समावेश होता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी उल्लेखनीय, नावीन्यपूर्ण व ऐतिहासिक योगदान दिल्याबद्दल रितू छाब्रिया यांचा सन्मान करण्यात आला आरोग्य, शिक्षण, युवक, क्रीडा या क्षेत्रांमध्ये लोकांच्या विकासासाठी मापदंड उंचावण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांचीही या समारंभात दखल घेण्यात आली
पुरस्कार मिळाल्यानंतर रितू छाब्रिया म्हणाल्या, दूरगामी बदल करण्यासाठी आणि एक परंपरा निर्माण करण्यासाठी समाजातील वंचित भागांच्या गरजा पूर्ण करणे हा प्रभावी मार्ग आहे, असे आमच्या मुकुल माधव फाउंडेशनला आणि व्यक्ती म्हणून मला वाटते.हे काम दीर्घकालीन शाश्वत भागीदारीद्वारे करत आहोत. प्रतिष्ठेच्या व्यासपीठाने दखल घेतल्याने आमच्या प्रयत्नांना आणखी प्रोत्साहन मिळणार आहे.
www.konkantoday.com