
आम्हाला घरी पाठवा अन्यथा पगार द्या अशी मागणी करत मुंब्रा परिसरात मोठ्या संख्येने मजूर जमले.
केंद्र सरकारकडून ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनबाबत घोषणा करुन देशातील नागरिकांना पुढील काही दिवस संयमाने सांगितलेल्या सूचनांचे पालन करा अशाप्रकारे आवाहन केले आहे.लॉकडाऊनमुळे हजारो मजुरांचे हाल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यातूनच मुंब्रा परिसरात देवरीपाडा येथे मोठ्या संख्येने मजूर एकत्र जमले. रोजंदारीवर काम करणाऱ्या या मजुरांचे हाल होत असल्याने त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आम्हाला घरी पाठवा अन्यथा पगार द्या अशी मागणी करत रस्त्यावर जोरजोरात घोषणाबाजी सुरु केली.मजुरांचा जमाव पाहून याठिकाणी पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या.
www.konkantoday.com