निसर्गप्रेमींनी कासवाला जीवदान दिले
रत्नदुर्ग किल्ल्यावरील दीपगृहाच्या खाडी किनारी म्हणजे कुरणवाडी परिसरात ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाला निसर्गप्रेमींनी जीवदान दिले. मासे पकडायच्या गळाला हे कासव अडकल्याने किनार्यावर आले. त्यामुळे त्याची सुटका येथील निसर्गप्रेमींनी केली व पुन्हा त्याला सुखरुप समुद्रात सोडले. किनार्यावरून गळ टाकून मासेमारी सुरू असताना हे कासव अडकल्याचे लक्षात आले. मोहम्मद शबान, रोहित बिर्जे, सुरज बावने, विवेक कळंबटे, शुभम भाटकर यांनी या कासवाला अडकलेल्या गळातून सुखरुप सोडविले.
www.konkantoday.com