शिवसेना एनडीएमधून बाहेर पडणार , शिवसेनेचे मंत्री अरविंद सावंत मंत्रिपदाचा राजीनामा देणार
महाराष्ट्रात आता सत्तेसाठी मोठय़ा घडामोडी होत असून शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन करणार हे जवळपास निश्चित झाले आहे त्याचाच एक भाग म्हणून केंद्रात शिवसेना एनडीएमधून बाहेर पडणार आहे शिवसेनेचे केंद्रातील मंत्री अरविंद सावंत यांनी आपण आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे ट्विटरवर जाहीर केले आहे सावंत हे सकाळी अकरा वाजता दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर करणार आहेत
www.konkantoday.com