रत्नागिरी पोलीस आयोजित रत्नागिरी कोस्टल मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून निरोगी आरोग्याचा मंत्र आणि एकतेचा संदेश देण्यासाठी आज दिनांक 09/11/2019 रोजी सकाळी 06.00 वा.रत्नागिरी शहरातून मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनमधून देशाला एकतेचा संदेश देण्यात आला. स्पर्धेचे ब्राीद वाक्य “युनायटेड रत्नागिरी फॉर यनायटेड इंडीया” असे ठेवण्यात आलेले होते. सदर मॅरेथॉनची सुरुवात मारुती मंदीर रत्नागिरी येथून करण्यात आली.
सदर स्पर्धेपुर्वी सहभागी स्पर्धकांचा वॉर्मअप व्हावा या उद्देशाने एम.फिटनेस रत्नागिरी व झुंबा कम्युनिटी रत्नागिरी यांचे वतीने झुंबा डान्सचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेकरीता मा.जिल्हाधिकारी श्री.सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, विधी सेवा प्राधिकरण सचिव न्या.श्री.सामंत, सेवानिवृत्त एअर चीफ मार्शल श्री.हेमंत भागवत, उपजिल्हाधिकारी (निवडणुक) श्री.बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक श्री.विशाल गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी श्री.भडकवार यांचेसह पोलीस अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी/कर्मचारी, पत्रकार व नागरीक मोठया संख्येने सहभागी झालेले होते. तसेच मंडणगड येथील स्नेहज्योती निवासी अंधशाळेमधील शिक्षक व विदयार्थी यांनी स्पर्धेमध्ये नोंदविलेला सहभाग हा विशेष लक्ष्यवेधी असाच होता.
21 कि.मी.स्पर्धेमधील स्पर्धेकरीता सेवानिवृत्त एअर चीफ मार्शल श्री.हेमंत भागवत यांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरवात करण्यात आली.
या मॅरेर्थानच्या आयोजनासाठी एक नियोजन समिती तयार करण्यात आलेली होती. जिल्हा पोलीसांना स्पर्धा यशस्वीतेसाठी रत्नागिरीतील अनेक औदयागिक कंपन्या, सर्व सामाजिक संस्था, पत्रकार आणि समाजातील प्रत्येक व्यक्ती यांनी विशेष प्रयत्न करून सदरची स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडणेकामी बहुमोल असे सहकार्य केलेले आहे. यामध्ये विशेष करुन जे.एस.डब्ल्यु., फिनोलेक्स, आंग्रे पोर्ट, विरश्री चॅरीटेबल ट्रस्ट, रत्नागिरी अॅथलेट असोसिएशन, लायन्स क्लब, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन, जॉयन्टस् क्लब रत्नागिरी, आय.एम.ए.रत्नागिरी, जाणीव फाऊंडेशन रत्नागिरी, रत्नागिरी पत्रकार संघ, रत्नदुर्ग माऊंटेनर्स रत्नागिरी, जिद्दी माऊंटेनरींग रत्नागिरी, ओम साई डेकोरेटर्स रत्नागिरी, मँगो इव्हेंट रत्नागिरी, क्रेडाई रत्नागिरी, गद्रे मरीन एक्सपोर्ट रत्नागिरी यांचा सहभाग आहे. श्री.गौतम बाष्टे व श्री.गणेश चौगुले यांनी सहभागी स्पर्धकांकरीता सेल्फी पॉर्इंट तयार केलेला होता. स्पर्धेकरीता सहभागी स्पर्धक यांचेकरीता स्पर्धेच्या मार्गावर आयोजक यांचेकडून पाणी, एनर्जी ड्रींकसह वैदयकिय पथक यांची व्यवस्था करण्यात आलेली होती.मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सर्व सहभागी स्पर्धकांना मेडल व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले तसेच प्रथम, व्दीतीय व तृतीय विजेत्या स्पर्धकांना मेडल व प्रमाणपत्रासह विशेष बक्षीस श्री.सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक श्री.विशाल गायकवाड, पत्रकार श्री.हेमंत वणजु, श्रीम.जान्हवी पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडु कु.संपदा धोपटकर, कु. ऐश्वर्या सावंत, कु.आकांक्षा कदम, कु.अपेक्षा सुतार यांचे हस्ते देण्यात आले. संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मँगो इव्हेंटचे श्री.अभिजीत गोडबोले यांनी केले.