
रेल्वेतून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या एका अनोळखी प्रवाशाचा लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
रेल्वेतून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या एका अनोळखी प्रवाशाचा लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दि. २१ ऑक्टोबर रोजी घडली. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे असून, अद्याप त्याचे नाव आणि गाव समजू शकलेले नाही.
आडवली रेल्वे स्टेशन ते येरवली रेल्वे स्टेशन दरम्यान किलोमीटर क्रमांक २३७/२८ येथे एक अनोळखी पुरुष प्रवाशी वेरवली एक्सप्रेस क्रमांक १६३३४ मधून पडून जखमी झाल्याची माहिती मिळाली.
गंभीर जखमी झालेल्या या प्रवाशाला तात्काळ उपचारासाठी लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी ५.४५ वाजता त्याला रुग्णालयात आणले गेले. मात्र, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्या प्रवाशाला मृत घोषित केले.




