
भातशेतीचे पंचनामे करताना कीड पडलेल्या भातशेतीचा समावेश नाही ,शेतकऱ्यांमध्ये नाराजी
रत्नागिरी जिल्हय़ातील भातशेतीचे नुकसानीचे ८५ टक्के पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती नुकतीच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली होती. मात्र हे पंचनामे करताना शेतकऱयांचे उभ्या असलेल्या पिकावर देखील पावसामुळे कीड पडली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीही लागणार नाही असे असताना
भातशेतीचे पंचनामे करताना फक्त खाली आडवे पडलेले भात आहे तेवढ्याच क्षेत्राचे पंचनामे अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांनी केले आहेत पण ज्या क्षेत्रामध्ये पावसामुळे भातावर प्रचंड प्रमाणात कीड पडली आहे वरती भाताची लोंबी शिल्लक नाही बाकी भात उभे आहे अशा कंडिशन मधील भातशेतीचा पंचनाम्यांमध्ये समावेश केलेला नाही तरी अशा भात शेतीचे सुद्धा नुकसानी मध्ये वर्गीकरण व्हावे अशी शेतकऱ्यां तर्फे मागणी होत आहे.याबाबत अधिकारीही योग्य रितीने शेतकऱ्यांचे पिकाचे पंचनामे करत आहेत की नाही याची वरिष्ठ अधिकार्यांनी माहिती घेणे जरुरीचे आहे तसे स्थानिक लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालणे आवश्यक आहे तरच शेतकऱ्यांना योग्य रितीने न्याय मिळू शकणार आहे
www.konkantoday.com