
जिल्ह्यात पिसाळलेल्या श्वानांच्या दंशाचे वाढते प्रकार
रत्नागिरी जिल्ह्यात पिसाळलेल्या कुंत्र्यांकडून चावे घेण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. शृंगारतळी येथे कुत्र्याने ५ जणांना चावा घेतल्याचा प्रकार घडला. येथील नागरिकांसह प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी येेथे ४ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. आज घडलेल्या या लागोपाठच्या घटनेने एक प्रकारची दहशत निर्माण झाली आहे. याशिवाय चिपळूण, राजापूरमध्येही भटक्या कुत्र्यांकडून चावे घेण्याचे प्रकार घडले असून त्यावर प्रतिबंधक उपाययोजना करण्याची गरज आहे.
www.konkantoday.com