
शिवसेनेच्या सततच्या टीकेमुळे अमित शहांचा महाराष्ट्रात हस्तक्षेप नाही ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस एकाकी पडले आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, शिवसेनेकडून सतत होत असलेल्या टीकेमुळे मोदी, शहा याबाबतीत लक्ष घालत नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शिवसेनेकडून होणारी टीका जोवर बंद होत नाही, तोपर्यंत याबाबत एकही शब्द बोलायाचा नाही, अशी भूमीका भाजप श्रेष्ठींनी घेतला असल्याचे बोलले जात आहेदरम्यान भाजपचे मुखपत्र असलेल्या तरुण भारतचे अग्रलेखामधून राऊत याचें वर नाव न घेता .टीका करण्यात आली आहे .शिवसेना नेते संजय राऊत ‘सामना’तून भाजपवर करत असलेल्या टीकेला तरूण भारतच्या अग्रलेखातून समाचार घेण्यात आला आहे. या अग्रलेखात संजय राऊत यांना बेताल आणि विदूषक असे संबोधत त्यांच्यावर जळजळीत शब्दांत टीका करण्यात आली आहे. ‘उद्धव आणि बेताल’, असे शीर्षक असणाऱ्या अग्रलेखात संजय राऊत यांच्या नावाचा थेट उल्लेख नाही. मात्र, उद्देशून आलेले संदर्भ तंतोतंत संजय राऊत यांना लागू पडत आहेत
www.konkantoday.com
.