
खेड नगरपालिका प्लास्टिक कचऱ्याबाबत जागृत
शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत खेड नगर पालिकेकडून शहर स्वच्छ ठेवण्याचा कसोशीचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी पालिका प्रशासनाकडूनही जनजागृतीवर भर दिला जात आहे. मोक्याच्या ठिकाणी एक कि.मी. अंतराच्या परिसरात कचर्यासह प्लास्टीक वस्तू टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा फतवा पालिका प्रशासनाने काढला आहे. तसे फलकही ठिकठिकाणी लावले आहेत. शहर स्वच्छता अभियानांतर्गत ओल्या व सुक्या कचर्याची योग्य तर्हेने विल्हेवाट लावण्याचीव्यवस्था केली असून यासाठी स्वतंत्र घंटागाडीही संपूर्ण शहरात फिरत आहे.
www.konkantoday.com