ग्राहकांनी वस्तू खरेदी केल्यानंतर पावती घेणे जरुरीचे
ग्राहकांनी वस्तू खरेदी केल्यानंतर त्याची पावती घ्यावी, मात्र या कर्तव्याची जाणीव ग्राहकांना कधीही नसते त्यामुळे बाजारात होणारर्या ग्राहकांच्या फसवणुकीला ते स्वतःच जबाबदार असल्याचे प्रतिपादन ग्राहक मंचाचे कोकण प्रांत अध्यक्ष विजय भागवत यांनी केले आहे.
ग्राहकांनी कोणत्याही वस्तूची खरेदी करताना ती वस्तू पारखून घेतली पाहिजेच शिवाय वस्तू खरेदी केल्यानंतर त्याची पावती घ्यायला विसरू नये, कारण यदाकदाचित आपण घेतलेल्या वस्तूबाबत आपली फसवणूक झाली तर त्याची दाद मागण्यासाठी या पावतीचा उपयोग होवू शकतो.
www.konkantoday.com