बेकायदेशीर भाडेवाढ केली तर खासगी ट्रॅव्हल्स वाल्यांवर कारवाई
सुटीच्या हंगामात वाटेल तशी बेकायदेशीर भाडे आकारून प्रवाशांची लुट करणार्या खासगी ट्रॅव्हल्सला आता परिवहन आयुक्तालयाने चाप लावला आहे. त्यांचा मनमानी कारभार थांबविण्यासाठी ते आदेश जारी केले आहेत.
राज्यातील खाजगी प्रवासी वाहनांकडून एसटी महामंडळाच्या त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सध्याचे भाडेदर विचारात घेवून त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणार्या प्रति कि.मी. भाडेदराच्या ५० टक्केपेक्षा अधिक भाडेवाढ खासगी ट्रॅव्हल्सधारकांना करता येणार नाही, असे आदेश आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली.
www.konkantoday.com