राजापूर मोबाइल शॉपीतील चोरी प्रकरणी दोन जण अटकेत, मुद्देमाल जप्त
राजापुर बाजारपेठ येथील श्री. खलील हसन सय्यद यांचे मालकीचे काद्रीया टेलीकम्युनिकेशन या मोबाईल शॉपीमधून दिनांक 23/10/2019 रोजी 20.30 ते दिनांक 24/10/2019 रोजी 08.30 वा.चे मुदतीत कोणीतरी अज्ञात चोरटयाने 1,75,500/- रु. किंमतीचे मोबाईल हॅन्डसेट व 20,000/- रु. रोख रक्कम असा एकूण 1,95,500/- रु. किंमतीचा मुद्देमाल चोरून नेलेला होता. सदर प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने शिताफीने तपास करून परप्रांतीय दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे
सदर गुन्हयाचे तपासकामी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.शिरीष सासने यांनी एक पथक तयार करुन त्यांनी राजापूर शहरातील तसेच रत्नागिरी जिल्ह्रातील असे गुन्हे करणारे गुन्हेगार यांची माहिती घेणेबाबत सूचना दिलेल्या होत्या. तसेच गोपनीय बातमीदार यांचेकडून ही माहीती घेण्यात येत होती.
सदर गुन्ह्राचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून तपास चालू असताना मुंबई-गोवा महामार्गावर सध्या परप्रांतीय कामगार काम करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून गोपनीय बातमीदार यांचेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासपथकाने सदर परप्रांतीय कामगारांकडे तपास केला. त्यावरुन झारखंड येथुन राजापूर येथे कामासाठी आलेले दोन अल्पवयीन मुलांकडे गुन्ह्राचे अनुषंगाने चौकशी केली असता, त्यांनी सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे देवून माहीती सांगणेस टाळाटाळ केली. परंतु दोन्ही इसमांकडे स्वतंत्र केलेल्या चौकशीमध्ये त्या दोघांचे सांगण्यामध्ये विसंगती आढळून आली. यामध्ये केलेल्या अधिक चौकशीमध्ये त्यांनी नमुद गुन्हयाची कबुली देवून मोबाईल शॉपीमधून मोबाईल हॅन्डसेट व रोख रक्कम चोरून राजापूर येथील कारेकर बिल्डींग येथील ते भाडयाने रहात असलेल्या रुममध्ये ठेवल्याचे सांगितल्याने तपास पथकाने सदर ठिकाणी जावून गुन्ह्रातील चोरीस गेलेले एकूण 16 मोबाईल हॅन्डसेट व 4300/- रु. रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण 1,84,670/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. तसेच त्यांचेकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी या गुन्ह्राबरोबरच राजापुर बाजारपेठ येथील किराणा मालाचे दुकानामध्ये चोरी केलेली असल्याची ही कबुली दिलेली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील तपास पथकास सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासामध्ये गुन्ह्राचा उलगडा करुन मुद्देमाल व चोरटयाचा छडा लावण्यात यश आलेले आहे. नमुद विधीसंघर्षित बालक यांना पुढील कार्यवाहीकरीता राजापूर पोलीस स्टेशनकडे सुपुर्द करण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.विशाल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री.शिरीष सासने, पोउनि श्री.विकास चव्हाण, संदीप कोळंबेकर, राजेश भुजबळराव, शांताराम झोरे, सुभाष भागणे, रमिज शेख, विजय आंबेकर, नितीन डोमणे, सागर साळवी, अमोल भोसले, दत्ता कांबळे, यांनी केलेली आहे.
www.konkantoday
com