पळणारे उंदीर थांबले असते तर सत्तांतर नक्की होते -राजू शेट्टी
अब की पार २२० पार’ म्हणणाऱ्या भाजपच्या घशात दात घालण्याचे काम आम्ही केले आहे. पळणारी उंदरे थांबवली असती आणि काँग्रेसच्या नेत्यांनी अजून जरा कणखरपणा आणि आक्रमकपणा दाखवला असता तर राज्यात सत्तांतर अटळ होते. कलम ३७० च्या तुणतुण्यासमोर शेतक-यांचे प्रश्न मांडण्यात आम्ही कमी पडलो, अशी खंत ‘स्वाभिमानी’चे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी व्यक्त केली.
www.konkantoday.com