लोकांना सत्तेचा उन्माद पसंत पडला नाही -शरद पवार
भाजपकडून ‘अबकी बार २२०’ असा नारा देण्यात आला होता. मात्र, लोकांनी त्याला स्वीकारलेले नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. यावेळी शरद पवार यांनी म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस जनतेचा निर्णय मान्य करत आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि मित्रपक्षांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. यंदाचे निकाल पाहता लोकांना सत्तेचा उन्माद पसंत पडलेला नाही, हे स्पष्ट झाले आहे. सत्ता येते, सत्ता जाते. मात्र, आपण कायम जमिनीवर पाय ठेवून काम करायचे असते. त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली तर लोकांकडून होतेच असे नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.
www.konkantoday.com