दादर स्थानकात तुतारी एक्स्प्रेसच्या प्लॅटफॉर्ममध्ये बदल

0
279

कोकणात जाणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसच्या दादरस्थानकातील प्लॅटफॉर्ममध्ये बदल करण्यात आलेला आहे. एक्स्प्रेसला जादा कोचही जोडण्यात येतील. ता. २३ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत तुतारी एक्स्प्रेसमध्ये हे बदल करण्यात आले आहेत. दिवाळीसाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांची सोय झाली आहे . ११००३-०४ दादर ते सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस ही नेहमी दादर टर्मिनसहून फलाट क्रमांक सातवरून सुटते, मात्र २३ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान ती फलाट क्रमांक पाचवरून रात्री १२ वाजून पाच मिनिटांनी सुटणार आहे. दादर स्थानकातील फलाट पाचवरच सकाळी सहा वाजून ४५ मिनिटांनी येणार आहे. या ट्रेनला स्लीपर क्लासचा एक आणि जनरल सेकंड क्लासचे तीन कोच जादा जोडण्यात येणार आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here