
कोकणात पडणार्या मुसळधार पावसामुळे भातशेती धोक्यात
गेले दोन तीन दिवस संपूर्ण कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. ढगफुटीप्रमाणे पडणार्या पावसामुळे कोकणातील शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे.कोकणात मोठय़ा प्रमाणात भातशेतीचे पीक घेतले जाते.हा हंगाम भातशेती कापणीचा हंगाम असतो.परंतु मुसळधार पडणार्या पावसामुळे भातशेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे लपाहायला मिळत आहे.मुसळधार पडणार्या पावसामुळे शेतकरी चिंतेत आहे.सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही शेतकर्यांकडून केली जात आहे.
www.konkantoday.com