उद्धव ठाकरे सतरा मिनिटांच्या भाषणात पंधरा मिनिटे नारायण राणेंवर बोलले -राणेंचा आरोप
सिंधुदुर्गात दोन सभा घेतलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणच्या विकासावर काय सांगितले, कोणती दूरदृष्टी दिली? १७ मिनिटांच्या भाषणात १५ मिनिटे नारायण राणेंवरच बोलले. वेळ पडल्यास माझ्यावरील टीकेला मातोश्रीसमोर उत्तर देईन. त्यांनी मागील २५ वर्षात मी केलेली कामे जरी सांगितली असती तरी चार तास लागले असते, असा पलटवार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सावंतवाडी येथे बोलताना केला .
www.konkantoday.com